कुठूनही शिकवा

विद्यार्थ्यांना शिकत राहण्यात मदत करण्यासाठी शिक्षक आणि कुटुंबांना आवश्यक असणारी टूल व टिपा देणे.

  • Google
  • UNESCO

तुमच्यासाठी योग्य असलेले टूल निवडा

शिक्षकांसाठी
शाळांसाठी
कुटुंबांसाठी

शिक्षकांसाठी

Google Workspace for Education खाते नाही का? तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आमच्या टूलच्या सूटसाठी येथे विनामूल्य साइन अप कसे करू शकतो ते जाणून घेण्यासाठी शाळा टॅब तपासा.

नवीनतम

  • अध्यापन आणि अध्ययनामध्ये समर्थन करणारी नवीन Google Meet वैशिष्ट्ये

    शिक्षणाच्या दूरस्थ किंवा संकरित वातावरणामध्ये नियमन आणि सहभाग सुधारण्यात शिक्षकांना मदत करण्यासाठी या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार्‍या नवीन Google Meet वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या.

    अधिक जाणून घ्या
  • आता प्रत्येकासाठी Assignments उपलब्ध आहेत

    Assignments हे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचे एक अ‍ॅप्लिकेशन आहे जे Google Workspace च्या सहयोगी शक्तीद्वारे - विद्यार्थ्यांना कार्याचे वितरण करणे, विश्लेषण करणे आणि श्रेणी देण्यासाठी शिक्षकांना वेगवान, सोपा मार्ग प्रदान करते.

    अधिक जाणून घ्या
  • वर्गांचे व्यवस्थापन करण्यात मदत करण्यासाठी नवीन Classroom वैशिष्ट्ये

    नवीन वैशिष्ट्ये जी वर्ग निर्मितीमध्ये सुधारणा करतात, आपल्याला असाइनमेंट्स ट्रॅक करण्यास आणि वापराबाबत चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करतात. तसेच, प्रथम वेळ वापरकर्त्यांसाठी नवीन संसाधने देतात.

    अधिक जाणून घ्या

मला व्हिडिओ कॉल वापरून रिमोट पद्धतीने कसे शिकवता येईल?

  • व्हिडिओ कॉलिंगसाठी तुमचे घर सेट करा

    मजबूत वायफाय सिग्नल असलेले स्थान, पुरेसा सूर्यप्रकाश आणि स्वच्छ बॅकग्राउंड शोधा.

  • तुमच्या वर्गासोबत व्हिडिओ कॉल सुरू करा

    तुम्ही Google Meet वापरून व्हिडिओ कॉल तयार करू शकता आणि तुमच्या संपूर्ण वर्गाला आमंत्रित करू शकता.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • त्वरित प्लेबॅकसाठी तुमचे धडे रेकॉर्ड करा

    तुमचे धडे रेकॉर्ड करा जेणेकरून तुमचे विद्यार्थी आणि सहकर्मचारी ते नंतर पाहू शकतील.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • तुमचा धडा लाइव्हस्ट्रीम करा

    लाइव्हस्ट्रीमिंग कमकुवत इंटरनेट कनेक्शनवर बँडविड्थ सेव्ह करते. तुमचे धडे रेकॉर्ड करा आणि विद्यार्थ्यांना नंतर अ‍ॅक्सेस करता यावेत यासाठी ते Classroom मध्ये पोस्ट करा.

    माहितीपत्रिका
    उघडा

मी व्हर्च्युअल वर्ग कसा व्यवस्थापित करू शकतो/शकते?

  • Google Classroom मध्ये तुमची पहिली असाइनमेंट तयार करा

    Google Classroom शिक्षकांना असाइनमेंट तयार करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी मदत करते, फीडबॅक देते आणि त्यांच्या वर्गासोबत संवाद साधते.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • तुमच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गाची वेबसाइट तयार करा

    Google Sites वापरून तुम्ही धड्याची माहिती देण्यासाठी, वर्कशीट, व्हिडिओ आणि आणखी बरेच काही होस्ट करण्यासाठी वर्गाची खाजगी वेबसाइट सहज तयार करू शकता.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • Google Slides वापरून तुमचा धडा तयार करा

    Google Slides तुमचे धडे विविध प्रकारच्या सादरीकरण थीम, एम्बेड केलेले व्हिडिओ, अ‍ॅनिमेशन आणि बरेच काही वापरून मनोरंजक बनवते.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • Google Docs तयार करा, शेअर करा आणि संपादित करा

    Google Docs वापरून रिअल टाइम सहयोग करा, जेथे तुम्ही दस्तऐवज तयार करणे, संपादित करणे, शेअर करणे आणि प्रिंट करणे हे सर्व एकाच ठिकाणी करू शकता.

    माहितीपत्रिका
    उघडा

मी धडा सर्वांना अ‍ॅक्सेस करण्यायोग्य कसा बनवू शकतो/ शकते?

  • लाइव्ह कॅप्शन वापरा

    Meet आणि Slides मध्ये कॅप्शन वापरा जेणेकरून मूकबधिर किंवा कमी ऐकू येणार्‍या विद्यार्थ्यांना तसेच अन्य विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रीत करण्यात मदत होईल.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • मजकूर मोठ्याने वाचण्यासाठी स्क्रीन रीडर वापरा

    जे विद्यार्थी अंध आहेत किंवा कमी पाहू शकतात अशांसाठी Chromebooks आणि Google Workspace for students वरील बिल्ट-इन स्क्रीन रीडर वापरा.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • Chromebook मधील अ‍ॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या

    तुमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या Chromebook मधील बिल्ट-इन असलेली अ‍ॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये कशी वापरावीत ते शिकवा.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • Google Workspace मधील अ‍ॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या

    तुमच्या विद्यार्थ्यांना Google Workspace मधील व्हॉइस टायपिंग आणि ब्रेल सपोर्ट यांसारखे साहाय्यकारी तंत्रज्ञान वापरायला शिकवा.

    माहितीपत्रिका
    उघडा

मी माझ्या विद्यार्थ्यांना गुंतवून कसे ठेवू?

  • विद्यार्थ्यांच्या चर्चेला उत्तेजन द्या

    Google Classroom मध्ये नंतर प्रश्न आणि टिप्पण्या पोस्ट करून विद्यार्थ्यांच्या चर्चेला प्रोत्साहन द्या.

    उघडा
  • एकास एक वेळ व्यवस्थापित करा

    Google Calendar मध्ये भेट आयोजित करा जेणेकरून विद्यार्थी तुमच्यासोबत वैयक्तिक एकास एक किंवा गट सत्र आयोजित करू शकतील.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • Read Along

    हे एक बोलण्यावर आधारित वाचन ॲप असून ते मुलांना वाचन शिकण्यास आणि सराव करण्यास प्रोत्साहन देते.

    उघडा
  • Google Docs मध्ये रिअल-टाइम फीडबॅक द्या

    विद्यार्थी Google Docs मध्ये काम करतात तेव्हा त्यांना फीडबॅक देऊन पाठिंबा द्या.

    उघडा

शाळांसाठी

या साइटवर सूचना वापरून पाहण्यासाठी, तुमच्याकडे Google Workspace for Education खाते असणे आवश्यक आहे. Google Workspace for Education हे जागतिक स्तरावरील पात्र शाळांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

मी माझ्या शाळेसाठी Google Workspace for Education कसे मिळवू?

  • पहिली पायरी - साइन अप करा

    तुमच्या शाळेसाठी साइन अप फॉर्म भरा. तुमच्याकडे स्वतःचे डोमेन असल्याची पडताळणी करा. मंजुरीसाठी काही दिवस लागू शकतात, कृपया वाट पाहा.

    माहितीपत्रिका
    साइन अप करा
  • दुसरी पायरी - वापरकर्ते तयार करा आणि रचना परिभाषित करा

    सेटिंग्ज आणि धोरणे लागू करण्यासाठी संघटनात्मक रचनेचा निर्णय घ्या आणि वापरकर्त्यांची CSV फाइल अपलोड करा.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • तिसरी पायरी - सेटिंग्जची रचना तयार करा

    कोणत्या वापरकर्त्यांना कोणत्या सेवांचा अ‍ॅक्सेस आहे ते निवडा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंग्ज सहजपणे लागू करा.

    माहितीपत्रिका
    उघडा
  • चौथी पायरी - प्रशिक्षण द्या

    शिकणे कधीच थांबत नाही. Google for Education टीचर सेंटर मध्ये शिक्षकांसाठी तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि स्रोत एक्सप्लोर करा.

    उघडा

मी माझ्या शाळेसाठी Chromebooks कसे मिळवावे?

  • पायरी १- Chromebooks आणि Chrome Education Upgrade खरेदी करा

    व्यवस्थापन सॉफ्टवेअरसह क्रोमबुक खरेदीसाठी प्रथम, Chromebooks निर्माता, रिसेलर किंवा Google for Education संघाशी संपर्क साधा.

    आमच्याशी संपर्क साधा
  • पायरी २ - नोंदणी करा आणि आपले डिव्हाइसेस सेट करा

    आपण आपले Chromebooks आणि Chrome Education Upgrades प्राप्त केल्यानंतर, त्यांची नोंदणी करा आणि त्यांना सेट करा किंवा आपल्या वापरकर्त्यांची थेट नोंदणी करण्यासाठी योजना करा.

    उघडा
  • पायरी ३ - तुमच्या डिव्हाईस पॉलिसी आणि सेटिंग्ज व्यवस्थापित करा

    Google अ‍ॅडमिन कन्सोलसह आपण Wi-Fi सेटिंग्ज, पूर्व-स्थापित केलेले अ‍ॅप्स निवडणे आणि Chrome ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीनतम आवृत्तीमध्ये स्वयं-अद्यतनित करण्यासाठी डिव्हाइसेसला भाग पाडणे यांसारख्या २०० पेक्षा जास्त धोरण सेटिंग्ज कॉन्फिगर करू शकता.

    उघडा
  • पायरी ४- Chromebooks घरी पाठवा किंवा त्यांना शाळेत ठेवा

    विद्यार्थ्यांसोबत घरी पाठवण्यासाठी किंवा शालेय सेटिंगमध्ये शेअर करण्यासाठी Chromebooks तयार करा.

    उघडा

कुटुंबांसाठी

आता शाळा घरूनच होत असल्याने विद्यार्थी नेहमीपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन घालवत आहेत. मुलांचा तंत्रज्ञानाचा वापर व्यवस्थापित करण्यासाठी आणि मुलांना पाठिंबा देण्यासाठी कुटुंबांना मदत करण्याकरिता या काही टिपा आणि टूल आहेत.

माझे मूल शाळेसाठी वापरत असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल मी कसे शिकू शकतो/शकते?

  • Google च्या टूलबद्दल जाणून घ्या

    शिक्षक आणि विद्यार्थी Chromebooks पासून Google Workspace for Education पर्यंत Google ची उत्पादने कशी वापरत आहेत हे शिकण्यात तुमची मदत करण्याकरिता आमचे पालकांसाठीचे मार्गदर्शक वाचा.

    उघडा
  • घरी वापरण्यासाठी Chromebooks सेट करा

    घरी वापरण्यासाठी तुमच्या मुलाच्या Chromebook मध्ये बिल्ट इन असलेली वैशिष्ट्ये कशी सेट करावीत आणि वापरावीत ते शिका.

    उघडा
  • अपंग विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅक्सेस करता येण्यायोग्य स्रोत शोधा

    तुमच्या मुलाच्या काही विशिष्ट गरजा असल्यास किंवा अपंगत्व असल्यास, Google Workspace आणि Chromebook बिल्ट इन असलेली वैशिष्ट्यांची अ‍ॅक्सेसिबिलिटी एक्सप्लोर करून त्यांना प्रोत्साहन द्या.

    उघडा
  • शाळेसंबंधित कामांमध्ये मदत मिळवा

    उच्च माध्यमिक शाळा आणि विद्यापीठस्तरीय काम समजून घेण्यात विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Google AI द्वारे प्रयोजित Socratic नावाचे शैक्षणिक अ‍ॅप वापरा.

    आणखी जाणून घ्या
    डाउनलोड करा

मी माझ्या मुलांचा तंत्रज्ञान वापर कसा व्यवस्थापित करू आणि त्यांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात कशी मदत करू?

  • आरोग्यदायी डिजिटल सवयी तयार करा

    तुमच्या मुलाचे ऑनलाइन शिकणे, खेळणे आणि एक्सप्लोर करणे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल मूलभूत नियम सेट करण्यासाठी Family Link अ‍ॅप वापरा.

    अधिक जाणून घ्या
  • डिजिटल जग एकत्र ढुंढाळा

    आम्ही प्रेरणादायी संभाषणे सुरू करण्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त अशा निरोगी सवयी ओळखण्यासाठी एक मार्गदर्शक तयार केले आहे.

    अधिक जाणून घ्या

माझ्या मुलाच्या शिक्षणास मदत करण्यासाठी मला अधिक आशय कुठे मिळेल?

  • तुमच्या कुटुंबासाठी गमतीदार साहस निवडा

    Google Arts and Culture सह मजेदार तथ्य, अद्भुत अ‍ॅक्टिव्हिटी आणि आश्चर्यकारक कथा एकत्र शोधा.

    उघडा
  • संपूर्ण कुटुंबासाठी शिकण्याचा स्रोत

    पालक YouTube वर शिक्षणासाठी पूरक आशय आणि अ‍ॅक्टिव्हिटी शोधू शकतात.

    उघडा
  • घरी वापरून पाहता येतील अशा मजेशीर कोडिंग अ‍ॅक्टिव्हिटी

    पालक या मार्गदर्शकाचा उपयोग मुलांना CS First सह सुरुवात करण्यात मदतीसाठी करू शकतात, हा एक आकर्षक व्हिडिओ-आधारित अभ्यासक्रम आहे जो हातांनी केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीद्वारे कोडिंग शिकवतो.

    वापरून पाहा

मी माझ्या मुलाच्या शाळेशी कसा संवाद साधू शकतो? आणि मी वेगळी भाषा बोलत असल्यास काय करावे?

  • Google Meet वापरून कॉल आयोजित करा

    तुम्ही आणि तुमचे मूल Meet वापरून शिक्षकांसह व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल सेट करू शकता.

    उघडा
  • Google Translate सह समजण्याची क्षमता वाढवा

    तुमच्या फोनवर संभाषणांचे भाषांतर करा किंवा इतर भाषांमध्ये संभाषण करण्यासाठी शब्द, दस्तऐवज किंवा ईमेल भाषांतरित करण्यासाठी कॅमेरा वापरा.

    उघडा
  • दुभाषी मोड वापरा

    तुमच्या फोनवरील Google Assistant सह भाषांमधील संवादांचे भाषांतर करण्यासाठी दुभाषी मोड वापरा किंवा तुमच्याकडे एखादे स्मार्ट डिव्हाइस असल्यास, ते वापरा.

    उघडा

  • सहकाऱ्यांचा समुदाय

    तुमच्या समुदायामधील इतरांशी संपर्क साधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी स्थानिक Google Educator Group मध्ये सामील व्हा.

    अधिक जाणून घ्या
  • व्हर्च्युअल कामाकाजाचे तास

    व्हर्च्युअल कामाकाजाचे तास आणि साप्ताहिक Twitter चॅटसह #TeachFromHome संभाषणामध्ये सामील व्हा.

    सामील व्हा

अतिरिक्त सपोर्ट आणि मदत

  • दूरस्थ शिक्षणासंबंधित आणखी स्रोत शोधा

    उत्पादन प्रशिक्षण, वेबिनार आणि Google for Education च्या COVID-19 संबंधित स्रोत पेजवरील आमच्या नवीनतम अपडेटचा ॲक्सेस मिळवा.

    उघडा
  • अतिरिक्त मदत मिळवा

    प्रश्न विचारण्यासाठी आणि उत्पादन तज्ञांशी थेट संपर्क साधण्यासाठी Google for Education च्या मदत केंद्राला आणि उत्पादन फोरमला भेट द्या.

    उघडा

कोठूनही शिकवण्याबद्दल

शाळा बंद असल्याचा परिणाम सर्वत्र शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांवर होतो. या विलक्षण काळात, तंत्रज्ञान, दूरस्थ शिक्षण सुलभ आणि अधिक अ‍ॅक्सेसिबल करण्यात मदत करते.

कोठूनही शिकवा हा एक Google पुरस्कृत उपक्रम आहे जो तुम्हाला सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतो. आमची सुरक्षित टूल विनामूल्य, कोठेही, कोणत्याही वेळी उपलब्ध आहेत, कोणत्याही डिव्हाइसवर सहयोगात्मक शिक्षण आणि शिकणे सुरू करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी शिक्षण सुरूच राहू शकते.

आमचे स्थानिक भागीदार

  • FICCI Arise

    FICCI Arise

    हा अशा जाणकार व्यक्तींचा समूह आहे की जे शालेय शिक्षणाचे विविध अंग जाणतात. ही रचना शिक्षणाच्या परिणामांना अधिक प्रभावी बनवण्यासाठी सरकार व खासगी संस्थांच्या प्रयत्नांना हातभार लावते आणि कोणतेही मूल मागे पडणार नाही याकडे लक्ष देते.